AGM News24

Latest Online Breaking News

उपमुकाअ नरेश भांडारकर यांची पळसगांव/राका शाळेला भेट

  • शाळेतील उपक्रम ,विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षणपूरक भोतिक परिसराचे भरभरून केले कौतुक

AGM न्यूज 24,सडक अर्जुनी, गोंदिया, दि-18 : पंचायत समिती सडक/अर्जूनी अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळेतील विविध उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी नरेश भांडारकर उपमूकाअ (साप्रवि) व एस.डी.गणविर उपमूकाअ (महिला व बालकल्याण) यांनी संयूक्तपणे शाळेला आकस्मिक भेट देऊन शाळेत सुरू असलेले विविध उपक्रम व विद्यार्थी गूणवत्ता तपासणी केली असता शाळेत सूरु असलेल्या शिक्षणपूरक उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले

शालेय सेंद्रीय परसबाग, विद्यार्थ्यांचे संगणकातील ज्ञान(मराठी टाईपिंग,प्रिंटिंग), विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षणपूरक आकर्षक भौतिक परिसर, आकर्षक वाचनकुटी आदी गोष्टींचे उपमूख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी निरिक्षण व तपासणी केली असता कोरोणा सारख्या भयावह परिस्थिती सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळेने गुणवत्तेसंदर्भात चमत्कारीक कामगिरी केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या श्रमदानाद्वारे तयार केलेल्या परसबागेतून 200रू.भाजीपाला विकत घेवून साहेबांनी खरी कमाईचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच शाळेला लागणा-या विविध भौतिक सूविधा पूरविण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन उपमूकाअ नरेश भांडारकर यांनी दिले.

यावेळी गावचे सरपंच सौ.भारतीताई लोथे ,ग्रामपंचायत सदस्य सौ.पूजा कापगते, सौ.सविता मल्लेवार,शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.फूंडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, विषय शिक्षक भास्कर नागपुरे, नितीन अंबादे ,कु.एस.टी.कापगते मॅडम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!