AGM News24

Latest Online Breaking News

भंडारा जिल्ह्यातील तीन नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत दोन ठिकाणी भाजपची सत्ता तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता

AGM न्यूज 24 भंडारा, दिनांक. १७- भंडारा जिल्ह्यातील 3 नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत लाखांदूर, मोहाडी येथे भाजपची सत्ता स्थापन झाली असून लाखनी येथे राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन केली आहे. एकंदरीतच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे जिल्ह्यातील असल्याने विशेषतः राज्याचं लक्ष भंडारा जिल्ह्याकडे वेधून होत, नाना पटोले यांच्याच मतदार संघातील लाखांदूर येथे भाजपाला एकहाती सत्ता स्थापन करता आली तर लाखनी नगर पंचायत येथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आला असुन प्रदेश अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना आपल्याच जिल्ह्यात काँग्रेसचा अध्यक्ष बनवता आला नसल्याने आता राजकीय स्थरावर चर्चेला उधाण आलं आहे..

तर दुसरीकडे मोहाडी नगर पंचायत येथे भाजपाला स्पष्ट बहुमत असतात सुद्धा भाजपा मध्ये गटबाजी चव्हाट्यावर आली होती. व भाजपचा एक गट राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्यार असल्याचे चित्र दिसत असतात वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपमुळे अखेर भाजपने मोहाडी नगर पंचायत येथे एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!