AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया जिल्हात तीन नगरपंचायत चे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष जाहीर

  • देवरी येथे भाजपचे निर्विवाद वर्चस्व तर सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी चे वर्चस्व
  • मोरगाव अर्जुनी येथे महाविकास आघाडीत बिघाडी येथे सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र

✍️-AGM न्यूज 24, गोंदिया, प्रतिनिधी

दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ : गोंदिया जिल्हात आज नगरपंचायत देवरी,सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथे आज नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.

देवरी नगरपंचायत

देवरी येथे भाजपचे संजू उके नगराध्यक्ष पदी निर्विरोध निवडणून आले तर भाजपच्या प्रज्ञा सांगीडवार उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांना 13 मते मिळाली. कांग्रेस चे सबरजित भाटिया याना 4 मते मिळाली देवरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकाने भाजपला मतदान केले. हे विशेष।

सडक अर्जुनी नगरपंचायत

सडक अर्जुनी नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष तेजराम मडावी यांची निर्विरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना डोंगरवार यांची निर्विरोध निवड करण्यात आली आहे.याठिकाणी राष्ट्रवादी चे वर्चस्व पाहण्यास मिळाले.

मोरगाव अर्जुनी नगरपंचायत

मोरगाव अर्जुनी नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजूषा बारसागडे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदी भाजपच्या ललिता टेम्भरे यांची नियुक्ती झाली.या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली असून एक नवीन समीकरण पुढे आले आहे.भाजपच्या ललिता टेम्भरे यांना 12 मते मिळाली आहेत. यात भाजपा 7 ,राष्ट्रवादी 4 आणि एक अपक्ष असे एकूण 12 मते मिळाली असून कांग्रेस 4 आणि शिवसेना 1 असे 5 मते असून.याठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली. येथे सत्तेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आले हे मात्र महत्त्वाचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!