AGM News24

Latest Online Breaking News

इस्तारी येथे भव्य शैक्षणिक किट वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज

AGM न्यूज 24,

एक हात मदतीचा अंतर्गत शिक्षक समिती जोपासणार सामाजिक बांधिलकी..

देवरी, गोंदिया :१८ फेब्रुवारी २०२२ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया तर्फे जिल्ह्यातील 2750 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप व क्रातीज्योती सावित्रीबाई फूले विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा इस्तारी येथे होणार असल्याची माहिती तालूकाध्यक्ष गजानन पाटणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

एक हात मदतीचा.. दर्शन घडवूया माणूसकिचा‘ हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा संपूर्ण जिल्ह्यात गरिब व गरजू विद्यार्थ्यांकरीता राबवविण्यात येणार असून याउपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 2750 विद्यार्थी लाभान्वित होणार आहेत.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यस्तरावर विद्यार्थी, शिक्षण,समाज व शिक्षक या घटकांना न्याय देणारी अग्रणी शिक्षक संघटना आहे.कोरोणाच्या धर्तीवर समाज भयानक परिस्थितीत असतांना शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासून जिल्ह्यात अनेक गरजू-गरिब लोकांना मदत केली आहे सोबतच आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील 1100 महिला शिक्षक भगिनींचा सत्कार सावित्रीच्या शिर्षकाअंतर्गत सत्कार केला.

एवढेच नव्हे तर कोविड लसीकरण संदर्भातील गैरसमज लोकांच्या मनातून दूर करण्यासाठी जनजागृतीपर स्वलिखीत कोवीड लसिकरण काव्य गायन स्पर्धा आयोजित करून शिक्षक समिती सामाजिक बांधिलकी जोपासली या सर्व नवोपक्रमाची नोंद महाराष्ट्रातील संघटन क्षेत्रात सूवर्ण अक्षराने लिहिल्या जाणार आहे.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल असणाऱ्या सालेकसा अंतर्गत दर्रेकसा केंद्र व देवरी तालुका अंतर्गत मिसपिर्री केंद्रातील 100% विद्यार्थ्यी,कोरोनामुळे पालकत्व गमावलेले विद्यार्थ्याकरीता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले विद्यार्थी दत्तक योजना” (तिन वर्षापर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत),जिल्ह्यातील 1048 जिल्हा परिषद शाळेअंतर्गत प्राथमिक शाळेतील एक विद्यार्थी व उच्च प्राथमिक शाळेतील 2 विद्यार्थ्यांना शैक्षणीक किट वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाची सूरूवात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा इस्तारी येथे आजपासून होणार असून बहूसंख्येने शिक्षक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!