AGM News24

Latest Online Breaking News

अर्जुनी नगरपंचायत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या ललिता टेंभरे विराजमान

– AGM News 24

गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, दिनांक-१६ : नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये अर्जुनी नगरपंचायत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ मंजुषा बारसागडे तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या सौ ललिता टेंबरे विराजमान झाल्या अर्जुनी नगर पंचायत मध्ये 17 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार भाजपाचे सात काँग्रेस पक्षाचे चार शिवसेना एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते

नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष याचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ मंजुषा बारसागडे ह्या बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून सौ ललिता टेंबरे तर काँग्रेसकडून सर्वेच्च भुतडा यांनी नामांकन दाखल केले होते यामध्ये भाजपाच्या सौ ललिता टेंभरे यांना 12 मते मिळाली तर काँग्रेसचे सर्वेश भुतडा यांना 5 मते मिळाली त्यामुळे उपाध्यक्ष पदावर भाजपाच्या सौ ललिता टेंभरे ह्या विराजमान झाल्या पीठासीन अधिकारी म्हणून अनिल सवाई यांनी काम पाहिले तर त्यांना नगरपंचायत मुख्याधिकारी कुमारी शिल्पारांनी जाधव यांनी सहकार्य केले

नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाने, सौ किरण ताई कांबळे, नगरसेवक दानेस साखरे, नगरसेवक सागर आरेकर, नगरसेवक दीक्षा शहारे, राकेश जायस्वाल, चित्रलेखा मिश्रा, सौ नीषाताई मस्के ,माधुरी पिंपळकर, सुमित्रा हातझाडे, शादिक हातझाडे, उद्धव मेहंदळे ,आर के जांभुळकर, महेंद्र शहारे, नानाजी पिंपळकर, राजेंद्र लाडे, आनंदराव बाळबुधे, वसंत हातझाडे ,पिंटू जीवानी, रामदास दखणे, निप्पल बरईया, देवानंद नंदेश्वर ,अजय अवचटे ,नेमीचंद डोंगरवार ,अजय टेंभुर्णी ,वैशाली बागडे, नरेंद्र रंगारी ,व इतरांनी अभिनंदन केले आहे

नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी अर्जुनी नगरपंचायत चा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!