AGM News24

Latest Online Breaking News

विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात भाजपचा जन आक्रोश मोर्चा

Featured Video Play Icon

AGM News 24

सडक-अर्जुनी, गोंदिया- दि.१५ फेब्रुवारी २०२२ सडक अर्जुनी येथून माजी मंत्री इंजिनीयर राजकुमार बडोले यांच्या निवास स्थानावरून शंभरच्यावर ट्रॅक्टर व हजारोच्या संख्येत विद्युत समस्येने त्रस्त शेतकऱ्यांनी आज देवरी येथे महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अर्जुनी-मोर विधानसभातर्फे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने येत्या महिन्याभरात वीजेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर जिल्हाभरात भाजपातर्फे रस्त्यावर उतरत सरकारला सडो की पळो करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा आज महाविकास आघाडी सरकारला देण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जुलमी राजवटित महावितरणचा अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांकडे दुर्लक्ष करीत बिनबोभाटपणे विजतोडणी सुरू आहे.सहा-सात महिने मागणी करूनसुद्धा ट्रान्सफॉर्मर मिळत नाही.कृषीपंपाचे मीटर रिडींग प्रमाणे विजेची आकारणी करण्यात येत नाही आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असुनही गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येत नाही.आणि त्यात आता शेतात पाणी असुनसुद्धा वीजवितरण महामंडळाच्या भोंगळ नियोजनामुळे जगावे की मरावे या परिस्थितीत शेतकरी आहे.

राज्यातील ठाकरे सरकार हे गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे असून जनतेच्या – शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.राज्यसरकारच्या तुघलकी वृत्तीमुळे शेतकरी पेटून उठला आहे.

आजच्या मोर्चाला माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले,भाजप प्रदेश सचिव माजी आमदार श्री.संजय पुराम,आमदार डाॅ.देवराम होळी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,भाजपा पदाधिकारी – कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!