AGM News24

Latest Online Breaking News

भदुटोला येथील मंजूर विविध विकास बांधकामांचे भूमिपूजन संपन्न

AGM News 24

सडक-अर्जुनी, गोंदिया,दि.१४- भदुटोला येथील मंजूर एकूण ३४ लक्ष रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यामध्ये १) स्थानिक आमदार विकास निधि अंतर्गत बिसेन सोनवाने ते विठ्ठल सलामे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्‍ता बांधकाम. ७ लक्ष.रु. २) जनसुविधा अंतर्गत विश्वास कापगते यांच्या घरापासून ते स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता खडीकरण. ८ लक्ष रु. ३) २५१५ अंतर्गत मानिक सलामे यांच्या घरापासून ते भोजराज कापगते यांच्या घरापर्यंत सीमेंट नाली बांधकाम. ७ लक्ष रु. ४) दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मानिक रामटेके यांच्या घरापासून ते शिला कानेकर घरापर्यंत सीमेंट नाली बांधकाम. ५ लक्ष रु. ५) १५ वित्त आयोग निधी अंतर्गत भदुटोला येथे सौर पंप व वाढीव पाईप लाईन बांधकाम. ४ लक्ष रु. ६)१५ वित्त आयोग निधी अंतर्गत भदुटोला येथे आंगनवाड़ी शौचालय बांधकाम. ३ लक्ष रु. या कामांचे समावेश आहेत.

भूमिपूजन प्रसंगी आमदार म्हणाले की, अर्जुनी/मोरगांव विधानसभा क्षेत्रचा विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.मतदारसंघात विविध माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

याप्रसंगी भारती लोथे सरपंच, सुभाष कापगते, अरविंद सलामे, कुवर मेश्राम, शालीकराम कापगते, भोजराम कापगते, गणेश यावलकर,पराग कापगते, निताराम मलेवार, विठ्ठल सलामे, आनंदराव कापगते, आत्माराम कापगते, गजानन कापगते, अनंत कापगते, कृष्णा कापगते, गोलु झींगरे, एकनाथ कापगते, मिथुन भराडे, अमोल मानकर , काशिनाथ पुस्तोडे, हरिचंद भांडारकर, सुनिल सोनवाने, सचिन पुस्तोडे, अजय कापगते, विठ्ठल कापगते मोहीत भांडारकर लिलाधर सलामे, विशाल कान्हेकर, तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!