AGM News24

Latest Online Breaking News

पळसगांव/राका येथे शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • सहा.पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी जोपासली सामाजिक बांधीलकी

AGMन्यूज24,सडक अर्जुनी, गोंदिया.दि-१४ – सडक अर्जुनी तालुका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळेत सूरु असलेल्या विविध उपक्रमामूळे प्रभावित होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी शाळेतील गरिब व गरजू मूलांसाठी 10 शैक्षणिक किट व एका गूणवंत मूलीसाठी कपडे भेट स्वरूपात दिल्यात त्यानूषंगाने शाळेत शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम गावचे सरपंच सौ.भारतीताई लोथे यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात घेण्यात आला.

समाजातील आज्ञनरुपी काळोख दूर करण्यासाठी आपल्या थोर समाज सूधारकांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार करून अख्ख आयुष्य खर्ची घातले.विद्यार्थी हित सर्वोतोपरी माणून कोरोणा सारख्या भयावह परिस्थिती सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळा आपल्या विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिली आहे.आपल्या दातृत्वाचा परिचय देत डुग्गीपार पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दहा शैक्षणिक कीटची व्यवस्था उपलब्ध करून दिली त्याअनुषंगाने शाळेत शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम गावचे सरपंच भारतीताई लोथे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,प्रमुख मान्यवर म्हणून गावचे उपसरपंच सुनील चांदेवार, पोलीस नाईक महेश वाठोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर मानकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कापगते, पूजा कापगते, सविता मल्लेवार, कुंदा सावरकर,ग्रामतंटामूक्त समिती अध्यक्ष टिलाराम कापगते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भोजराज कापगते, देवा कापगते,राजेश परशुरामकर, नरेंद्र उईके ,मनिषा मल्लेवार यांचे उपस्थितीत घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संचालन पद्वीधर शिक्षक संदिप तिडके यांनी केले तर आभार मूख्याध्यापक एस.आर.फूंडे यांनी मानले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.आर.फूंडे,पदवीधर शिक्षक संदीप तिडके, विषय शिक्षक भास्कर नागपुरे, नितीन अंबादे ,कु. viagra doses एस.टी.कापगते मॅडम व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!