AGM News24

Latest Online Breaking News

भव्य किसान जन आक्रोश मोर्चा

सडक-अर्जुनी, गोंदिया,दिनांक – १३ – महाविकास आघाडी सरकारचे खोेटे आश्वासन व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शेतकरी विरोधक नियम यांच्यामुळे शेतकरी व शेतमंजुराना जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र अर्जुनी/मोरच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडाेले यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून भव्य किसान जन आक्रोश मोर्चाच्या रुपात ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

भव्य किसान जन आक्रोश मोर्चाचे आयोजन भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र अर्जुनी/मोरच्यावतीने शेतकरी व शेतमजूर यांचा दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता, टी- पाईंट कोहमारा ते विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय देवरी येथे करण्यात येणार आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

१) कृषी वीज पंप धारकांना २४ तास वीज मिळाली पाहिजे.

२) कृषी वीज धारकांचे वीज बिल पूर्णत: माफ झाले पाहिजे.

३) थकबाकीच्या कारणांनी तोडण्यात आलेले कृषी पंपाचे कनेक्शन त्वरीत जोडणी करावी.

४) ज्यानी डिमांड भरला, परंतु त्यांना अजूनही मीटर लावले नाही, अशा प्रलंबित प्रकरणातील संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांचे शेतात मीटर लावून द्यावे.

५) यानंतर येणारे वीज बिल हे मीटरचे रिडिंग घेवूनच आले पाहिजे.

६) ज्यांचे शेतात वीज आहे. परंतु त्यांना सोलर पंप लावायचा आहे. अशा शेतकऱ्यांना कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंपाचा लाभ देण्यात यावा.

७) कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडू नये.

८) कृषी पंपाचे नादुरुस्त मीटर त्वरीत दुरुस्त करून घ्यावे.

९) गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे गडचचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्हाला सुध्दा नियमित २४ तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यात यावा.

या सर्व मागण्यांसाठी १५ फेब्रुवारी रोजी टी-पॉईंट कोहमारा ते विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय देवरी येथे भव्य किसान जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!