AGM News24

Latest Online Breaking News

सडक-अर्जुनी येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

सडक-अर्जुनी, गोंदिया, ११ फेब्रुवारी २०२२ – स्पोर्टिंग क्लब सडक अर्जुनी च्या वतीने शिवमंदीर बसस्थानक परिसरात दिवस व रात्रकालीन तीन दिवसीय व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्‌घाटन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते , माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक देवचंद तरोणे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात पार पडले .

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक महेंद्र वजारी , नगरसेवक तेजराम मडावी , आनंदकुमार अग्रवाल , गोपीचंद खेडकर , अश्लेश अंबादे , नगरसेविका दिक्षा भगत , भाजपा जिल्हा सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे , शिवसेना जिल्हा संघटक राजूभाऊ पटले , तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे , आरोग्य सेविका उषा जगताप, पत्रकार बिरला गणाविर , सामाजिक कार्यकर्ता डॉ . रविंद्र रामटेके , आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी खेळामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे असून या माध्यमातून गुणवत्ता प्राप्त करता येते . त्यामुळे खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडूंनी पोहण्याचा प्रयत्न करावा . प्रगतीचे शिखर कसे गाढता येईल याकडे लक्ष ठेवणे गरजचे असल्याचे आमदार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक अजय गायकी यांनी तर संचालन बंटी संय्याम यांनी केले व सर्वांचे आभार बिरला गनवीर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!