AGM News24

Latest Online Breaking News

देवरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप चे संजू उईके यांचे नामांकन.

AGM न्यूज 24, देवरी,


नगरपंचायत देवरीच्या निवडणूका नुकतेच संपन्न झाल्या भाजपने आपले ११ नगरसेवक निवडून आणून भाजपचा कमल फुलविला. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत अनुसूचित जमातीच्या सर्वसामान्य प्रवर्गाला गेली त्यामुळे भाजपचे ३ चेहरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती. त्यामध्ये संजू उईके , कौशल्य बाई कुंभरे आणि नूतन सयाम यांच्या नावाची चर्चा होती. आज गुरुवार (१०फेब्रु. ) अखेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे संजू उईके यांचे नामांकन अर्ज दाखल झाले.

संजू शेषलाल उईके यांचे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी कडून एक फॉर्म सूचक प्रभाग क्र. ४ चे नगर सेवक रितेश सुरेश अग्रवाल व अनुमोदक करीता संजय रतीराम दरवडे प्रभाग क्र. ११ चे नगर सेवक यांनी सही केली आहे.

दरम्यान, नामांकन अर्ज दाखल करते वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहिकर, द भंडारा अर्बन बैंक चे माजी अध्यक्ष व वरिष्ठ नेता महेश जैन, अँड. भूषण मस्करे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!