AGM News24

Latest Online Breaking News

अर्जुनी मोर. नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल

AGMन्यूज24,अर्जुनी-मोरगाव, गोंदिया

सर्वसाधारण महीला साठी खुला असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी अर्जुनी मोर. नगरपंचायत मधे आज नगराध्यक्ष पदासाठी चार महिला नगरसेवीकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवसी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंजुषा वीरेंद्र बारसागडे, काॅग्रेस तर्फे दिव्या महेश पशिने, तर भाजप तर्फे ममता अरुण भैय्या,व ललिता देवेंद्र टेंभरे यांनी नगरपंचायत अर्जुनी मोर च्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायत मधे भाजपा सात,काॅग्रेस चार,राष्ट्रवादी काँग्रेस चार,शिवसेना एक,व,अपक्ष एक,असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही.त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी मोठाच अडथळा निर्माण होत आहे. अजुन पर्यंत कोणत्याही पक्षात सत्ता स्थापनेच्या युती संदर्भात बोलणीसुध्दा झाल्याच्या चर्चा ऐकु येत नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यातील महाविकास आघाडीचा फार्म्यूला लागु केल्यास काॅग्रेस चार, राष्ट्रवादी चार व शिवसेना एक असा विचार झाला तर नगर पंचायत मधे महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन होवु शकते. अशा शहरात चर्चा सुरु आहेत. मात्र तसे होण्याचे चिन्ह अजुनपर्यंत दिसुन येत नाही.तर भाजपाकडे सात नगरसेवक आहेत.बहुमतासाठी अजुन दोन नगरसेवकांची गरज आहे. एक अपक्ष व एक शिवसेना मिळुन सत्ता स्थापन करु असा सुरवातीचा गणीत होता.मात्र अपक्ष उमेदवार सुषमा दामले ह्या राष्ट्रवादी च्या गटात सामील झाल्याच्या चर्चा आहेत.कारन दामले यांना उमेदवारी देण्यापासुन तर निवडुन आने पर्यंत पुर्वीच्या भाजपाच्या गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपंचायत निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा त्यांनी कसून प्रचार केला. मात्र किरण कांबळे ह्यांनी सत्ता स्थापन होण्याच्या मुहुर्तावरच भाजपा ला रामराम ठोकुन राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला. व त्यांनी अपक्ष उमेदवार दामले यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या खेम्यात दाखल केल्याने भाजपाचा सत्ता स्थापन करण्याचा गणीत बिघडला.गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐनवेळी भाजप काॅग्रेस युती होवुन सत्ता स्थापन होणार तर नाही ना?

या चर्चांना शहरात उधाण आले आहे. सध्यातरी भाजपकडुन दोन नगरसेवकांनी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवार अध्यक्ष बनण्यासाठी तटस्थ आहेत.सत्तेचे गणीत ऐनवेळी बदलु ही शकते.१५ फेब्रुवारी ला उमेदवारी अर्ज मागे घेणे आहे.१६ फेब्रुवारी ला अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे .सत्ता स्थापनेसंदर्भात अजुनही कोणतेच ठोस निर्णय झाल्याचे चर्चा नाही.त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अर्जुनी मोर च्या नगराध्यक्ष कोण होणार याची शहरवासींयाना उत्कंठा लागली आहे. कोणता फार्म्यूला कामी येवुन अध्यक्ष व उपाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे १६ फेब्रुवारी ला कळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!