AGM News24

Latest Online Breaking News

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते घोटी येथे सिमेंट रस्ता बांधकामांचे भूमिपूजन

  • २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

AGM न्यूज24, सडक अर्जुनी, गोंदिया

दिनांक ०८/०२/२०२२– मंगळवार ला सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथे २५१५ अंतर्गत, अंताराम मुनिश्वरते भागवत बावनकर यांचा घरा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम तसेच महादेव तरोणे ते मुरलीजी मुनिश्वर यांचा घरा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे या कामासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी मागील अर्थसंकल्पा मध्ये मंजूर करून घेऊन या कामाचा भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार म्हणाले की, मतदारसंघाचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न कायम सुरूच आहेत. आपल्या मतदारसंघाचे रूप बदलून टाकण्यासाठी येणाऱ्या काळातही मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून नियोजनबद्ध पणे काम करणार आहे.

याप्रसंगी दिनेश कोरे सरपंच, यशकुमार बोरकर सदस्य , सत्यवती मुनिश्वर सदस्य, विनय हेमणे सदस्य, पांडुरंग खोटेले उपसरपंच, कुमार ब्राम्हणकर, चोपराम मुनिश्वर, माधुरी मांदाळे, शांताबाई मांदाळे, नेतराम ब्राम्हणकर, अजय मुनिश्वर, प्रदीप ब्राम्हणकर, व गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!