AGM News24

Latest Online Breaking News

नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करा

  • शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथकं तयार करणार
  • शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ

मुंबई, वृत्तसेवा, दिनांक – 9 फेब्रुवारी 2022 :शिवभोजन थाळी योजने संदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अन्न,नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे,सहसचिव सुधीर तुंगार, सहसचिव चारुशीला तांबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

शिवभोजन केंद्राच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. शिवभोजन थाळीची गुणवत्तेकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथकं तयार करा. शिवभोजनच्या गुणवत्ते मध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.

शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित आहे. या कामासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत होती मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांच्या मागणीनुसार या कामाला थोडा अवधी वाढवून मिळावा अशी मागणी होती. हे लक्षात घेता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. trop de viagra

शिवभोजन चालकांना शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो एका अँप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम राज्य सरकारने आखलेला आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे येथून पुढे हे फोटो अपलोड करण्यासाठी शिवभोजन केंद्रापासून १०० मिटर एव्हढी मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे शिवभोजन चालकाला १०० मीटरच्या आत म्हणजेच शिवभोजन केंद्रावर उपस्थित राहूनच फोटो अपलोड करावा लागणार आहे.

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून,राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवभोजन ही योजना २६ जानेवारी २०२० सुरु करण्यात आली.आतापर्यंत 9 फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुमारे ८ कोटी ३४ लाख ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.अल्पकालावधीत ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे.सध्या राज्यात १५२१ शिवभोजन केंद्र आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत अडीच कोटी शिवभोजन थाळयांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे अशा सूचनाही बैठकीत दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!