AGM News24

Latest Online Breaking News

हळदी कुंकू कार्यक्रम व नवनिर्वाचित महिला सदस्यांचा सत्कार संपन्न

दिनांक ९ फेब्रुवारी २०२२:- राजाराम लॉन तुमसर येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन सौ. रंजीता राजू कारेमोरे महिला भगिनी व सखी मंडळ तुमसर यांनी केले होते, स्वर्गीय मनोहरभाई पटेल, भारताची कोकिळा लता मंगेशकर, सावित्रीबाई फुले,व सरस्वती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली याठिकाणी सर्व नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डायलॉग सोबत, एकल नृत्य, समूह नृत्य, व लकी ड्रॉ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तुमसर मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, व ग्रामपंचायत च्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमास उपस्थित महिला भगिनींना लकी ड्रॉ विजेता,व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला भगिनींना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला

कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. करूणा ताई धुर्वे उदघाटक सौ. सरोज ताई भुरे व विशेष अतिथि सौ. पमा ठाकुर , रत्नमाला लांजे , डॉ सुधा ताई भुरे , कल्याणी भुरे, उज्वला मेश्राम, कविता साखरवाडे, मिना गाढवे ,प्रिती शेंडे , विजया चोपकर , गीताताई कोंडेवार, आरती चकोले , जयश्री गभणे, प्रेरणा तुरकर, यमु राखडे, कविता साखरवाड़े नंदा डोरले, शुभांगी राहंगडाले, खुश लता गजभिये, शालीनी पेठे, अश्विनी बिसने, नेहा मोटघरे, स्वीटी कुरेशी,वंदना मलेवार, कुसुम कांबड़े,सिमा भुरे,मीरा भट, चंदा धार्मिक ,अलका देशमुख, सरीता मदनकर,मंजूषा बुरडे,शांता बाई बावनकर , वॄंदा गायधने, सुलभा हटवार , सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. मंच संचालन भारती तितरमारे यांनी तर आभार पमा ठाकुर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!