AGM News24

Latest Online Breaking News

घटेगांव येथील चुलबन्ध नाल्यावरील पुलाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भूमिपूजन

AGM न्यूज 24, सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक ८ :-

मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना अंतर्गत ,एम.एस.एच. ११ डव्वा ते घोटी-घटेगांव-मुंडीपार रस्त्यावर साखळी क्र. ६/४०० वरील पुलाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते दिनांक ०८/०२/२०२२ रोजी झाले.

घटेगांव येथील चुलबन्ध नाल्यावरील बंधारा कम पुल करण्यात यावा अशी मागणी घटेगांव-मुंडीपार नागरिकांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती. यासाठी आमदार यांनी या प्रश्नी लक्ष घालून ग्रामविकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे काम मंजूर झाले.सदर काम ४ कोटी ७७ लक्षचे असुन लांबी ७० मीटरची आहे. भूमिपूजन प्रसंगी आमदार चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांघितले सोबतच पुलाचे काम दर्जेदार करण्यासाठी संबंधित अभियन्ताना सूचना दिल्या.

ग्राम पंचायत घटेगांवचे सरपंच श्री.श्यामराव वासनिक यांनी पुलाचे काम मंजूर करुन काम सुरु केल्या बद्दल आमदार महोदयांचे आभार मानले.याप्रसंगी सर्वश्री. डी. यु राहंगडाले अध्यक्ष सरपंच संघटना सडक अर्जुनी , श्रीमती. सुधा राहंगडाले जि.प सदस्य, श्रीमती.निशाताई काशिवार पं.स. सदस्य, श्यामराव वासनिक सरपंच घटेगाव, श्रीपत कवरे उपसरपंच, रेखाताई कोसरकर , दुर्गाताई नेवारे, योगिताताई शेंडे, कुंदाताई नेवारे, भाऊचंद बीसेन, शिवदयाल यावलकर ,नामदेव शिंदे तीर्थराज चचाने, अविनाश गोंडाने , अशित वासनिक, व गावातील मान्यवर नागरिक उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्यमंत्री ग्राम सडक योजना उपअभियंता राजेश पटले यांनी केले तर उपस्थितांचे आभार नामदेवराव शेंडे माजी सरपंच घटेगांव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!