AGM News24

Latest Online Breaking News

शेतातील विनापरवानगीने झाडे कटाई केल्या प्रकरणी कारवाई

AGM न्यूज 24,सडक अर्जुनी, गोंदिया

वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अन्तर्गत येणार्‍या सहवनक्षेत्रात शेतातील विना परवानगीने झाडे कापुन खसरा प्रकरणात अवैध माल परस्पर तोंडल्याची माहिती पुढे आली आहे.
तालुक्यातील काही ठेकदारानी शेतातील झाडे विना परवानगीने कापण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे. शेतातील झाडे शेतकऱ्याकडुन विकत घेउन वन विभागाची परवानगी घेतात. पण काही ठिकाणी परवानगी न घेता परस्पर झाडाची तोड करुन एखादे शेतात एकञ जमा करुन ठेवतात. एकत्र सागवान माल ठेवल्याची माहीती मिळताच, शेंडा सहवनक्षेत्रातील कर्मचात्यांनी कंबर कसून कारवाई केली आहे.
यामुळे विनापरवानगीने शेतातील झाडे कापणाऱ्या शेतकऱ्यांचे, ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरणात वनरक्षक नरेश पातोडे, दिलीप माहुरे यांनी लेमन पंधरे रा. शेंडा, अक्षय बन्सोड रा. मसरामटोला, भरतराम मरस्कोल्हे,रा. कोयलारी, सुधाकर सयाम, रां. मसराम टोला व ईतर ईसम यांच्यावर विनापरवानगीने झाडे कटाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
शेतातील सागवन माल लगेच शासकीय आगार डोंगरगाव /डेपो येथे पाठवला आहे.या प्रकरणाची चौकशी फिरोज पठान क्षेत्रसहाय्यक हे करीत आहेत. काही ठेकेदार जंगलातील सागवान झाडे कपात असल्याचे तक्रारी सडक अर्जुनी तालुक्यात होत आहेत. त्यासंबंधाने शेंडा सहवनक्षेत्रातील कर्मचारी यांनी जंगलाची गस्ती वाढऊन तपास केला परंतु अवैध तोड दिसुन आली नसुन तक्रारी ह्या निरर्थक असल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

शेंडा परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड झालेली नाही, एका खसरा प्रकरणातील ठेकेदाराने शेतकऱ्याच्या शेतातील माल तोडून गैरव्यवहार करण्याचा प्रकार केला होता , त्याला आळा घालण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून सदर सागवान माल डोंगरगाव/ डेपो येथे जप्त करुन जमा केला आहे.

फिरोज पठाण
क्षेत्र सहाय्यक शेंडा
त. सडक अर्जुनी

शेंडा बिटातील मालकी शेतामध्ये बिना परवांगीने सागवान झाडांची कटाई करण्यात आली होती, तशी महिती मिळताच सदर शेतकऱ्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964, कलम 3 अन्वये वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

नरेशकुमार पातोडे
बिटरक्षक, शेंडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!