AGM News24

Latest Online Breaking News

दुग्गीपार पोलिस स्टेशनमध्ये भंगार वाहनांचा लिलाव कार्यक्रम संपन्न

AGM न्यूज24, गोंदिया, सडक अर्जुनी

दिंनाक – ०७ फेब्रुवारी २०२२: रोजी पोनी सचिन वांगडे ठाणेदार पोलीस स्टेशन डुग्गीपार यांचे प्रयत्नाने पो. स्टे, डुग्गीपार येथे मागील काही वर्षा पासुन गुन्ह्यातील डिटेन केलेले व बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांचे मालक मिळुन न आलेले एकुण २४ वाहनाची लीलावाकरीता उप विभागीय दंडाधिकारी अर्जुनी मोर. यांचे कडुन रितसर परवानगी प्राप्त करून आज दि. ०७ फेब्रुवारी रोजी पो.स्टे. डुग्गीपारचे आवारात विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी तसेच संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात जाहीर लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर लिलावाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रम आव्हाड़ प्रथम श्रोणी न्यायदंडाधिकारी न्यायालय सडक अर्जुनी यांचे उपस्थितीत पार पाडले सदर कार्यक्रमात परिसरातील २५ लोकांनी अमानती रक्कम भरुन लिलावामध्ये सहभाग घेतला होता. सदर लिलाव प्रक्रियेत ८-८ वाहनाचे ३ लाट पाडुन लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली. लिलावाची पहीली लाटेची बोली २५ हजार रुपये पासून सुरु करण्यात आली. पहिली बोली ६१ हजार रुपये वर भास्कर कुरसुंगे, डव्वा, दुसरी बोली ७२६०० रुपये तर लोकेश लेखराज डोंगरवार सौंदड तिसरी बोली १००५०० रुपये अशी  ईलियास याकुब शाह, डोंगरगाव डेपो यांनी लिलावाने खरेदी केले आहे. असे एकुण २,३४,१०० रुपये लिलावाने वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक विक्रम आव्हाड प्रथम श्रोणी न्याय दंडाधिकारी न्यायालय सडक अर्जुनी यांनी माहीतीचा अधिकार अधिनियम सन २००५ बाबत कायद्याचा चौकटीत राहुन आपल्याला माहीती मागविण्याचा अधिकारा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्र्वर, राजेश मुनिश्र्वर, अरविंद मेंढे, राधेश्याम कावरे, चंद्रमुणी बनसोड, बबलू मारवाडी, सुशील लाडे, परिसरातील शेकडो जनसमुदाय, तसेच पोलीस स्टेशन चे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार पोहवा. हरिश्चंद्र शेंडे यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!