AGM News24

Latest Online Breaking News

कॉन्ग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

यवतमाळ- वृत्तसेवा ५ फेब्रुवारी २०२२ :- जिल्ह्यातील बाभुळगाव, कळंब, मारेगाव, झरी, महागांव, राळेगाव नगरपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी करत विजयी झालेल्या, काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष बनला आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेस पक्षाचा पाया भक्कम होत असून आगामी काळात काँग्रेस पक्षाला पुन्हा वैभव प्राप्त होईल याचा विश्वास आहे.

काँग्रेस ही एक मजबूत विचारधारा आहे, ती कोणीही संपवू शकत नाही हे या निवडणुकीतील निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.

महात्मा गांधी, स्व.नेहरुजी, स्व.इंदिराजी आणि राजीवजी गांधी यांचे विचार या देशासाठी ताकद म्हणून सदैव उभे आहे. पुन्हा देश उभा करण्याची ताकद काँग्रेस विचारांमध्ये आहे याची जाणीव देशातील जनतेला होत आहे.

देव, धर्म, हिंदू या भावनांचा वापर करत भाजपने ओबीसी समाजाला भरकटत ठेवले. मागील १० वर्षात देशातील ओबीसी समाजाचा वापर भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी केला, परंतु आता राज्यातच नव्हे तर देशभरातील ओबीसी समाजाला भाजपची प्रवृत्ती कळून चुकली आहे. त्यामुळेच देशातील ओबीसी समाज आता भाजप पासून दूर होत पुन्हा काँग्रेस पक्षाकडे वळत आहे.

बारा बलुतेदार, अठरापगड जाती, सर्व लहान मोठ्या समाजाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला त्यांच्यासाठी कार्य करायचे आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी ही जबाबदारी स्वीकारावी व या समाजापर्यंत पोहचून त्यांची कामे करावी, त्यांना काँग्रेस पक्षासोबत जोडून घ्यावे. हे ध्येय पुढे ठेवून काम केल्यास काँग्रेस पक्षाची घोडदौड कोणीही थांबवू शकणार नाही हे निश्चित आहे.

सत्कार सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. शिवाजीराव मोघे, मा.श्री.माणिकराव ठाकरे , आमदार डॉ. वजाहत मिर्झा प्रा.श्री. वसंतराव पुरके.यांच्यासह काँग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!