AGM News24

Latest Online Breaking News

आ.चंद्रिकापुरेंनी केला सुवर्णपदक विजेत्या हिना मुनिश्र्वर यांचा सत्कार

तालुक्यातील क्रिडा संकुल साठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून मुलांना सोई सुविधा उपलब्ध करू आ. मनोहर चंद्रिकापुरे

AGM न्यूज 24

सडक-अर्जुनी / गोंदिया :- कोहमारा येथील एरिया 51 येथे आमदार जनसंपर्क कार्यालयात कु. हिना कैलास मुनिश्र्वर मु. केसलवाडा या सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थीचा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तरप्रदेश व गोवा येथे युथ गेम कॉन्सील ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदक प्राप्त करून एका लहान खेड्या गावाचे आणि तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल हिना मुनिश्र्वर या मुलीचा जाहीर सत्कार करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेपाल येथे भाग घेण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी आमदार चंद्रिकापुरे यांनी घेतली असल्याचे सांगितले.

यावेळी प्रामुख्याने अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, प्रा मंजूताई चंद्रीकापुरे नगरसेवक देवचंद तरोणे, वंदनाताई डोंगरवार,आंनद अग्रवाल, कामिनी कोवे, शाईस्ता शेख, प.स.सदस्य डॉ.आर.बी.वाढई, देवाजी बनकर,रजनी गिरहेपुंजे, प्रियंक उजवने, अतुल फुले, दिनेश साखरे, समीर आरेकर, दीक्षा शहारे, मंजुषा बारसागडे, अंजलीताई मुनिश्वर, अनिलजी मुनिश्वर, राजेश मुनिश्र्वर, कैलास मुनिश्र्वर, अरविंद मेंढे, निखिल मुनिश्र्वर मुलीचे आई वडील व अन्य कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधु उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार दुलाराम चंद्रिकापुरे यांनी केले.

Covid-19 चे नियम पाळून सत्कार समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!