AGM News24

Latest Online Breaking News

खोडशिवनी येथे सिमेंट रस्ता बांधकामांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते भूमिपूजन

AGM News 24 प्रधान संपादक – अनिल गोविंदरावजी मुनिश्र्वर

सडक-अर्जुनी/गोंदिया – खोडशिवनी येथे २५१५ अंतर्गत, मनोहर परशुरामकर ते योगराज बावणे यांचा घरा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे या कामासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मागील अर्थसंकल्पा मध्ये मंजूर करून घेऊन या कामाचा भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आला .

यावेळी आमदार म्हणाले की, मतदारसंघाचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न कायम सुरूच आहेत. आपल्या मतदारसंघाचे रूप बदलून टाकण्यासाठी येणाऱ्या काळातही मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून नियोजनबद्ध पणे काम करणार आहे.याप्रसंगी गंगाधर परशुरामकर जिल्हाध्यक्ष राकॉप, रमेश चु-हे माजी जि.प सदस्य, डॉ रुखीराम वाढई प.स सदस्य, इंदुताई परशुरामकर माजी प.स. सदस्य,सुभाष उके ,सुरेश बावणे, शीलास मेश्राम, घनश्याम वरखडे, भोला कापगते, आस्तिक परशुरामकर, गुलाब उईके, सुरेश कवरे, खुशाल डूंभरे, पतिराम परशुरामकर, भोला बावनकर, आसाराम शेंडे, देवमल परशुरामकर, प्रमोद मौजे, निमराव वरखडे, ललिताबाई भूमेश्वर लंजे, व गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!