AGM News24

Latest Online Breaking News

बोपाबोडी येथे मनरेगा कामाला सुरूवात – सौ. रंजना गोबाडे

Arvind Mendhe sub-editor AGM News 24

सडक-अर्जुनी : ५ फेब्रुवारी २०२२ – तालुक्यातील बोपाबोडी गावात आज दिनांक. ५ फेब्रुवारी रोजी मनरेगा कामाला सुरूवात झाली. जवळपास ५ लाख अंदाजपत्रकीय कीमतीचा पांदन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

शेतीच्या पूर्व हंगामापूर्वी सुरू झालेल्या या कामाला मजुरांची उपस्थिती लक्षणीय आहे. मजूरवर्ग कामाच्या शोधात असतांना काम सुरू झाल्याने मजुर वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाचे भूमिपूजन बोपाबोडी गावचे प्रथम नागरिक सौ. रंजना गोबाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी इंजिनियर मेश्राम सर, सचिव आर. पी शहारे, उपसरपंच सौ. वैशाली रामटेके , रोजगार सेवक भगवान कापगते, ग्रामपंचायत सदस्य सौ. लिला कापगते, सौ. आशा गोबाडे, सौ. भावना कापगते, सौ. उषा मेश्राम, श्री. शोभाराम नाकाडे, श्री. शैलेश नंदागवळी, श्री. गुलाब डोंगरवार, श्री. भोजराम मलखांबे हे उपस्थित होते.

यावेळी सरपंच सौ. रंजना गोबाडे यांनी सर्व मजुरांना आवाहन केले की. शासनाने सांगितल्या प्रमाणे covid-19 चे नियम लक्षात घेता मास्क लावून काम करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!