AGM News24

Latest Online Breaking News

परेश सेदानी यांच्या बाजीगर 11 संघाने पटकावले जी पी एल स्पर्धेचे विजेतेपद

अकोला – येथील परेश सेदानी क्रिकेट ग्राउंड ,आर डी जी वूमन कॉलेज जवळ येथे दि 28,29,30 जानेवारीला संजयभाई लोंढिया द्वारा गुजराती प्रीमिअर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये निकुंज गढीया यांची लोहाणा इंडियन, संजय लोढिया यांची नमो 11,सचिन पारेख यांची डी एफ सी 11,राजुभाई पटेल यांची पटेल 11,परेश सेदानी यांची बाजीगर 11,आणि परेश पारेख यांची एम सी जी 11 आदी संघाचा समावेश आहे गुजराती प्रीमिअर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचे पहिल्या दिवशी चे सामने संपेपर्यंत सर्वांच्या नजरेत पराजित संघ समजल्या जाणाऱ्या बाजीगर 11 या संघाने रोमांचकारी खेळ दाखवत एम सी जी 11 या बलाढ्य संघाला चारी मुंड्या चित करीत गुजराती प्रीमिअर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

गुजराती प्रीमिअर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेल्या परेश सेदानी यांच्या बाजीगर 11 संघाच्या विजयात कर्णधार परेश सेदानी,उपकर्णधार कुमार बोसमिया,मान्नन ठक्कर,साहिल सेठ,वरुण सेदानी ,प्रकाश मणियार,रिशीत पंचमीया, संकेत वखारीया,अंकित पंचमीया,हर्षल गोडा, आर्यन वखारीया,स्मित भाटी, कुणाल पंचमीया, यांचे मोलाचे योगदान राहिले या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण यु ट्यूब वर करण्यात आल्याने हजारोंनी या स्पर्धेचा आनंद लुटला आहे.

गुजराती प्रीमिअर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचे पदक वितरण समारंभासाठी सर्वश्री गोविंदभाई सोढा,दिपेनभाई शहा ,वालजीभाई पटेल, महेंद्रभाई गढीया,हिमेन्द्र राजगुरू, निमेशभाई ठक्कर लालाभाई भीमज्यानी यांची प्रमुख उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!