AGM News24

Latest Online Breaking News

आंबेओहळ प्रकल्पातून रविवारी सोडणार पहिले पाणी

  • कोल्हापुरात कालवे बैठकीत निर्णय
  • उपसा व जलसिंचन योजना करून पाण्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन

कोल्हापूर, वृत्तसेवा – दि. ४: तुडुंब भरलेल्या आंबेहोळ प्रकल्पातून शेतीसाठी पहिल्यांदाच पाणी सोडण्याचा कार्यक्रम रविवारी (ता. ६) होणार आहे. सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कोल्हापुरातील सिंचन भवनमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी ही माहिती दिली.

सव्वा टीएमसी साठवण क्षमतेचा आंबेओहोळ प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. त्यापैकी एक थेंबही पाण्याचा वापर झालेला नाही. या प्रकल्पाच्या पाण्यावर वैयक्तिक, शेतकरी मंडळाच्या आणि सामुदायिक अशा प्रकारच्या पाणी योजना तयार करून हरितक्रांती करूया. या योजनांसाठी लागणारे आर्थिक सहकार्य सर्वतोपरी करू. आंबेओहोळ प्रकल्पावर वैयक्तिक, शेतकऱ्यांनी मिळून शेतकरी मंडळाच्या पाणीयोजना उभारण्यासाठी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करू.सामुदायिक मोठ्या पाणी योजना उभारण्यासाठी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या हमीवर अर्थपुरवठा करू.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तूर विभागांमधील उत्तूरसह महागोंड, महागोंडवाडी, वडकशिवाले, होन्याळी, हालेवाडी, करपेवाडी, आर्दाळ, चव्हाणवाडी, पेंढारवाडी, मुमेवाडी तर गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव- गिजवणे विभागातील कडगाव – गिजवणेसह शिपुर तर्फ आजरा, करंबळी, अत्याळ, बेळगुंदी, लींगणूर, बेकनाळ, जखेवाडी व गडहिंग्लजच्या शिवारात ही हरितक्रांती होणार आहे.

यावेळी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, संभाजीराव यादव, कागलच्या तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, उपअभियंता भाग्यश्री पाटील, पाटबंधारे विभागाचे दिनेश खट्टे, विजय वांगणेकर या प्रमुखांसह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!