AGM News24

Latest Online Breaking News

जुगार अड्ड्यावर छापा, २ लाख १८ हजार १८० रुपयाच्या मुद्देमालासह सात जन ताब्यात

पोलिस पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसानी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सडक-अर्जुनी/ गोंदिया : (Arvind Mendhe Sub-Editor AGM News 24 )

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत डव्वा येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापडा रचून जुगार अड्ड्यावर धाड मारली. यावेळी ७ आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी एकूण २ लाख १८ हजार १८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना ३१ जानेवारी रोजीची आहे. सविस्तर असे की, डुग्गीपार पोलीस ठाण्या हद्दीतील डव्वा येथील डीकेव्ही. भोजनालयाच्या मागील खाली पळीत जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार सचिन वांगळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान सापडा रचून जुगार अड्ड्यावर धाड मारली. combien coute le viagra en france

यावेळी फळावर असलेले १५०० रुपये रोख, अंगझळतीत १६ हजार ४६० रुपये, ४ मोटारसायकल व तासपत्ते असा एकूण २ लाख १८ हजार १८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी शैलेश धनीराम लटिये, (२९) रा. डव्वा, ईश्वरदास जगन्नाथ लंजे (५०) रा. कोहडीटोला, नितीन रमेश भिमटे (३५), रमेश सोहनलाल अग्रवाल (५१) रा. डव्वा, संजय ढेकल येडे (३५) रा.खजरी, धनपाल मूलचंद टेंभुर्णे (३९) रा. डव्वा, वामन आनंदराव खोटेले (४२)रा. कोहडीटोला या सात आरोपींना ताब्यात घेऊन यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हवा. धावडे करीत आहेत ही कारवाई ठाणेदार सचिन वांगळे, पोलीस हवा. जगदेश्वर बिसेन, शिवलाल धावडे, उत्तम दहिवले, संतोष राऊत, झुमन वाढई, महेंद्र सोनवणे, सुनील डहाके आदींनी पार पाडली.

कारवाईत काय काय जप्त?

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण २ लाख १८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी चार मोटारसायकल व तासपत्ते ताब्यात घेतले आहे. यासोबतच पोलिसांनी जुगारचं साहित्यही हस्तगत केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!