AGM News24

Latest Online Breaking News

गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या अतिरिक्त शेतजमीनीची व जागेची माहिती नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायती आणि तलाठी कार्यालयाला द्यावी = नाना पटोले.

भंडारा:३ फेब्रुवारी २०२२

भंडारा जिल्ह्यात असलेले आणि राष्ट्रीय प्रकल्प असलेले गोसेखुर्द धरण 34 वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. अंदाज बांधल्याप्रमाणे किती भाग नेमका प्रभावित होतो यासाठीच हे पाणी विशिष्ट कालावधी पर्यंत थांबवण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात आजुबाजुचे क्षेत्र प्रभावित झाले. धरण पूर्ण भरल्यानंतर डिजिटल (ड्रोन) सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाद्वारे देखील पूर्ण झाले आहे. जेव्हा गोसेखुर्द धरणाच्या निर्माणाचा विचार केला होता तेव्हा या प्रकल्पाअंतर्गत येणारी शेती, गावे ही जेवढी बाधित होणार होती त्यापेक्षा जास्त गावे आणि शेती आज बाधित झालेली आहे. याचं सर्वेक्षण आणि माहिती सॅटेलाईटद्वारे घेणे सुरु आहे. काही गावे आणि गावाअंतर्गत शेती क्षेत्र अशी आहेत जी आधी घेतलेल्या माहिती पेक्षा अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज पासून या धरणातील पाणी काही प्रमाणात सोडण्यास सुरुवात झालेली आहे, आता काही दिवस धरणाच्या आजूबाजूच्या प्रकल्प बाधित शेतात किंवा गावात बॅकवॉटर राहणार नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणखी जमा होऊन आजूबाजूच्या शेतीचं आणि गावांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता जे पाणी थांबवले होते आणि त्याच्या बैकवाटरमुळे जी शेती, गावे, शेतीक्षेत्र प्रभावित झाली आणि त्यामध्ये प्रकल्पाचे पाणी शिरले, अशा गावातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेताची किंवा कुठल्याही अतिरिक बाधित क्षेत्राची माहिती तलाठी कार्यालय व स्थानिक ग्रामपंचायतीला द्यावी आणि ग्रामपंचायतीने ही माहिती जिल्हाधिकारी भंडारा यांना तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या कार्यालयाला देखील घ्यायची आहे कारण येणाऱ्या काळात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

सॅटेलाइट सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे, मात्र त्याच्यात काही गावे किंवा शेतीक्षेत्र सुटण्याची शक्यता आहे. पुन्हा दोन वर्षानी सदर प्रकल्पातील पानी याच पद्धतीने कायमस्वरूपी थांबवन्यात येईल. त्यामुळे सर्व बाधित गावांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आपल्या अतिरिक्त बाधित क्षेत्राची माहिती स्थानिक ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाला देऊन त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी भंडारा तसेच नानाभाऊ पटोले जनसंपर्क कार्यालयात देखील द्यावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले आहे. या अतिरिक्त बाधित झालेल्या क्षेत्राच्या माहितीमुळे अतिरिक बाधित क्षेत्रातील शेतकरी बांधवांना शासनामार्फ़त न्याय देता येईल असे देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!