AGM News24

Latest Online Breaking News

हिना मुनिश्र्वर , आता 9 ला नेपाळ ला जाणार पण हलाखीची परिस्थिती आळ येते.

AGM News 24 सडक-अर्जुनी –

सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या केसलवाडा या एका छोट्याशा गावातील हिना कैलास मुनीश्वर हिला उत्तर प्रदेश येथे आयोजित नॅशनल स्पोर्ट्स व गोवा येथे आयोजित युथ गेम कौन्सिल ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणी 3000 मीटरच्या धाव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सडक अर्जुनी तालुक्याचा व गोंदिया जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे .

हिना ही गुरुकुल कॅरियर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे.3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याबद्दल ॲकॅडमी चे राजेश शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .हिना ने आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीच्या संस्थापिका सुषमा राजेश शेंडे, प्रशिक्षक गुलशन केजर कर, अमित मडावी सर, वडील कैलास मुनिश्वर, आई सुलचना मुनिश्वर, आजोबा ईश्वरदास मुनिश्वर तसेच शाळेतील शिक्षकांना दिले.

येत्या 9 फरवरी 22 ला इंटरनॅशनल स्पर्धा नेपाळ येथे होणार आहे. त्याकरिता तिची स्वतःची स्पर्धेची तयारी सुरू आहे. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती नेपाळला जाऊ शकत नाही .हिना चे आई वडील मोलमजुरी करून स्वतःचा कसातरी उदरनिर्वाह करून मुलाचे शिक्षण करतात ,पण पुढील स्पर्धेकरिता नेपाळला पाठवण्यासाठी पैसे नसल्याची चिंता, त्यांनी व्यक्त केली आहे .कुणी आर्थिक मदत करतील काय, अशा अपेक्षेत आई-वडील आहेत.मुलीच्या अंगात गुण आहेत, परंतु गरीब परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!