AGM News24

Latest Online Breaking News

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांची पळसगाव/ राका शाळेला भेट

  • उपक्रमाचे कौतुक करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे दिले आश्वासन

AGM News 24, सडक अर्जुनी-

सडक अर्जुनी तालुका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळेतील विविध उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी शाळेला आकस्मिक भेट देऊन शाळेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती जाणून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा दाखवली.

कोरोणा सारख्या भयावह परिस्थिती सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका शाळा आपल्या विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिली असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या श्रमदानाद्वारे तयार केलेल्या परसबागेचे निरीक्षण करण्याकरीता व शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती जाणून घेण्याकरता पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी शाळेला भेट दिली व 100 दिवस वाचन अभियानांतर्गत शाळेतील चावडीमध्ये काही निवडक विद्यार्थ्यांचे वाचनाचे निरीक्षण केले. सोबतच इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी कुमारी करीना मेश्राम हिने म्हटलेली संविधान उद्देशिका ऐकून साहेबांना शाळेतील विद्यार्थ्यांबद्दल विशेष कौतुक वाटले सोबतच ‘प्रेरणा जिजाऊची वसा सावित्रीचा’ या उपक्रमाअंतर्गत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती शाळेतील शिक्षकांनी साहेबांना अवगत करून दिली असता त्याअंतर्गत ‘मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय….’ या प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले असता साहेबांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

शाळेत कार्यरत असणाऱ्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आपल्याकडून शैक्षणिक साहित्य किट स्वरूपात देण्याची इच्छा दर्शवून शाळेतील 10 अतिशय गरीब व गरजू विद्यार्थ्यांची यादी मागितली व कार्यक्रमाद्वारे दहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्याचे आश्वासन दिले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.फूंडे,पदवीधर शिक्षक संदीप तिडके, विषय शिक्षक भास्कर नागपुरे, नितीन अंबादे ,कु.एस.टी.कापगते मॅडम उपस्थित होते. composant actif du viagra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!