AGM News24

Latest Online Breaking News

दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ गोपीनाथ गडावर नतमस्तक

परळी- वृत्तसेवा । दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२ ।अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली, त्यानंतर बॅकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद पत्की तर उपाध्यक्ष पदावर ॲड. राजेश्वर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच माजी अध्यक्षा शरयू हेबाळकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, बिपिन क्षीरसागर, किशन पवार, राजाभाऊ दहिवाळ, चैनसुख जाजू, मकरंद सोनेसांगवीकर, जयकिरण कांबळे, डॉ. विवेक दंडे आदींनी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बॅकेला अधिक प्रगतीपथावर नेऊ असा विश्वास संचालकांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वैद्यनाथ कारखान्याच्या वतीने सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक व्यंकटराव कराड व कर्मचारी उपस्थित होते. भाजपचे युवा नेते श्रीराम मुंडे यांच्या निवासस्थानी देखील त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. viagra en pommade यावेळी उमेश खाडे, राजाभाऊ होळंबे, रामहरी फड, ज्ञानेश्वर मुंडे, अमोल रोडे, प्रल्हाद गित्ते, बाबा शिंदे आदींची उपस्थित होते.••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!