AGM News24

Latest Online Breaking News

देवरी नगरपंचायत मध्ये भाजप चा अध्यक्ष, सडक अर्जुनी मध्ये राष्ट्रवादी चा अध्यक्ष तर मोरगाव अर्जुनी अद्याप स्पष्ट नाही.

अनिल मूनिश्वर, गोंदिया

अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू

https://youtu.be/Y0yIDtiKjYo

गोंदिया जिल्हातील देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तिन्ही नगरपंचायत चे आरक्षण जाहीर झाले असून देवरी आणि सडक अर्जुनी येथे अनुसूचित जमाती( सर्वसाधारण ) राखीव , तर मोरगाव अर्जुनी येथे खुला प्रवर्ग ( महिला ) राखीव आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. देवरी तालुक्यात भाजप कळे 3 उमेदवार अनुसूचित जमाती मधून निवडणूक आले आहेत. त्यामध्ये संजू शेषराव उईके ,कौसल्या नारायण कुंभरे आणि नुतन अमर सयाम (कोवे) हे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

सडक अर्जुनी मध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार अनुसूचित जमाती मधुन निवडणूक आले आहेत त्यात तेजराम किसन मडावी आणि कामिनी प्रदीप कोवे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत .मोरगाव अर्जुनी मध्ये महिला अध्यक्ष असून कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने भाजप ,राष्ट्रवादी, कांग्रेस आणि अपक्ष मधील 10 महिला उमेदवार अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असून कोणत्या पक्षाचे गठबंधन होते त्यावर अवलंबून आहे.

नगरपंचायत पक्षीय स्थीती

देवरी :-
भाजप – 11
कांग्रेस – 04
राष्ट्रवादी – 02

सडक अर्जुनी :-
राष्ट्रवादी – 7
कांग्रेस – 2
भाजप – 1
शिवसेना – 1
अपक्ष – 6

मोरगाव अर्जुनी :-
भाजप – 7
कांग्रेस -4
राष्ट्रवादी -4
शिवसेना – 1
अपक्ष – 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!