AGM News24

Latest Online Breaking News

चेतन वळगाये ठरले गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक मताने निवडून येणारे पहिले पंचायत समिती सदस्य

अनिल मुनिश्र्वर-मुख्य संपादक

सडक-अर्जुनी – नुकत्याच पार पडलेल्या जि. प./प.स. च्या २०२१-२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकुण ५३ जि. प.व १०६ पंचायत समिती च्या निवडणुका पार पडल्या त्यात राष्ट्रवादी चा बालेकिल्ला समजला जाणारा डव्वा (पळसगांव) जि, प.क्षेत्रात राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष गंगाधर जी परशुरामकर हे रिंगणात होते. त्यांचा २७६८ मतांनी पराभव करुन भाजपा चे डाँ भुमेश्वर पटले हे विजयी झाले व त्या क्षेत्रात पहिल्यांदा जि. प.चा भाजपा चा उमेदवार निवडुन येण्याची मुहुर्त मेढ रोवली त्याच बरोबर डव्वा प.स.मधुन भाजपा चे शांलीदर कापगते विजयी झाले तर डो़गरगांव/ खजरी प.स.क्षेत्रामधुन भाजपा चे सर्वाच्या परिचयाचे झाडीपट्टी तील उत्कृष्ट नाट्य कलावंत चेतन वळगाये यांनी प. स. क्षेत्र डोंगरगाव येथे एकुण झालेल्या ७१०३मतापैकी३११६मते घेऊन १३४३ मतांची आघाडी घेत १०६ पंचायत समिती पैकी जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडुन येणारे पहिले पंचायत समिती सदस्य ठरले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी संजय चिचाम (राष्ट्रवादी) यांना १७७३ मते तर काँग्रेसचे आनंद जोशी यांना १५०८ मते मिळाली व तिसऱ्या क्रमांकावर राहीले. अगदी सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले चेतन वळगाये यांना अगदी लहान पणापासुनच राजकारणाची आवड आहे त्यात त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी डव्वा ग्रा. प.सदस्य पद भुषविले सलग तीन वेळा ग्रा. प. ला निवडून आले व सध्या उपसरपंच म्हणून कार्यत होते. राजकारणा बरोबर समाजात सुध्दा सतत अग्रेसर असतात. त्याच बरोबर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर ह्या चार जिल्ह्यात उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून त्यांची ख्याती आहे अशा ह्या बहुगुणी असलेल्या उमेदवार ला मतदारानी पहीली पसंती देत जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान प्राप्त करुन दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान व अनेक पदाची जिम्मेदारी सांभाळून सतत् २५ वर्षापासून पक्षाशी प्रामाणिक असणाऱे व निवडुन येणाऱ्या उमेदवारापैकी १० सदस्य असलेल्या पंचायत समिती च्या सदस्य पदी भाजपा-७ , काँग्रेस १ ,राष्ट्रवादी,२ असे संख्याबळ आहे त्यात भाजपा ला स्पष्ट बहुमतअसल्याने पक्षात अनेक पदाची जबाबदारी सांभाळणारे,अनुभवी वाढ वर्षापासून पक्षात अगदी प्रामाणिक असणारे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार जी बडोले साहेब यांचे अगदी जवळचे विश्वासुअसल्यामुळे सडक/अर्जुनी पंचायत समिती चे सभापती पदी विराजमान व्हावेत असा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!