AGM News24

Latest Online Breaking News

आमदार मा.मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रमुख उपस्थित विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न

गोंदिया – ३१ जानेवारी २०२२ :- गोंदिया येथे अर्जुनी-मोरगांव विधानसभा क्षेत्रातील झाशीनगर उपसा सिंचन योजना, कालपाथरी मध्यम प्रकल्प, इटीयाडोह, चुलबन्ध मध्यम प्रकल्प,रेंगेपार, उमरझरी, नवेगांव लघु प्रकल्प,जुनवानी, या प्रकल्पांचा कामांबाबत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रमुख उपस्थित विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी महामंडळांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध प्रकल्पांत येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.

इटीयाडोह या धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे. पाणी वाटपाची समस्या पाणी वाटप संस्थानाची बैठक करून तत्काळ सोडविण्यात यावी.

अर्जुनी-मोरगांव विधानसभा क्षेत्रातील अनेक ठिकाणी पाण्याचा मोठा दुर्भिक्ष आहे, अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या भागातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचे असेल तर ही व्यवस्था आपल्याला करावीच लागेल. अशी सुचनाही आमदार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

काही महत्त्वाचे प्रश्न या बैठकांदरम्यान चर्चेला आले त्यावरही विचारविमर्ष करण्यात आला. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यावर कार्यवाही करून संबंधित भागातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाईल.झाशीनगर उपसा सिंचन योजना, कालपाथरी मध्यम प्रकल्प, इटीयाडोह, चुलबन्ध मध्यम प्रकल्प,रेंगेपार, उमरझरी, नवेगांव लघु प्रकल्प,जुनवानी, या प्रकल्पाची विशेष दुरुस्तीसाठी पैशांची मागणी केली आहे काही मागणी पूर्ण झालेली आहेत व काही काम प्रगतिपथावर आहेत.

सदर बैठकीत श्री आर. जी.पराते मुख्य अभियंता, सोंनाली सोनुले कार्यकारी अभियंता, आर. जी.कुरेकर कार्यकारी अभियंता इटियाडोह, अमृतराज पाटिल कार्यकारी अभियंता झाशीनगर उपसा सिंचन योजना, समीर बनसोडे डिप्टी इंजी.नवेगांव बांध, दीपक भिवगड़े एस.डी ई.अर्जुनी/मोर ,एच. डी. लंजे जे. ई. गोठणगांव, शहारे डिप्टी इंजी गोंदिया, चौरागडे जे.ई गोंदिया उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!