AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी/स, कोहमारा येथे रोहयो अंतर्गत मंजूर कामांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते भूमिपूजन

अनिल गोविंदराव मुनिश्र्वर-प्रधान संपादक

सडक-अर्जुनी ३१ जानेवारी २०२२ – सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी/स, कोहमारा येथे रोहयो अंतर्गत मंजूर तलावाचे खोलिकरण बाम्हणी/स तसेच नाला सरळीकरण कोहमारा या कामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले. रोहयोचा माध्यमातून दोन्ही गावातील ३०० मजूरांच्या हाताला काम मिळाले.

याप्रसंगी दुलाराम चंद्रिकापुरे, कविताताई रंगारी जि.प सदस्य, शिवाजी गहाणे पं. स. सदस्य, सविताताई तरोने सरपंच बाम्हणी/स, वंदना थोटे सरपंच कोहमारा, उपविभागीय अभियंता वासुदेव रामटेककर, कनिष्ठ अभियंता उमेश बिसेन, खेमलाल मस्करे, सोहनलाल रहांगडाले, जगदीश पंधरे, अरविंद मेंढे, आनंद इडपाते,संजय शहारे,तसेच बाम्हणी/स, कोहमारातील ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!