AGM News24

Latest Online Breaking News

समाजसेविका सविता बेदरकर यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला

अरविंद मेंढे – उपसंपादक

गोंदिया –

गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनेद्र भुरले, याच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गोंदियातील जेष्ठ समाजसेविका सविता बेदरकर भुरले यांचे ते पती आहेत.

गोंदिया शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर धनेद्र भुरले, यांच्या शेतात अनाथालयाचे बांधकाम सुरू असुन भुरले यांना आज संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात आरोपीने फोन करून तुम्ही कुठे आहात असी विचारणा केली असता भुरले यांनी मी शेतावरुन घरी परत येत आहे अशी माहिती त्यांनी फोन करून दिली असता गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ अज्ञात आरोपीने त्यांना एका दुचाकी वाहनावरून येत रस्त्यात अडवत त्याच्यावर गोळीबार केला असून हा गोळीबार छऱ्या वाल्या बंदुकीने केल्याने धर्मेद्र भुरले चेहर्‍यावर गंभीर इजा झाली असुन त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असून रामनगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!