AGM News24

Latest Online Breaking News

फेरतपासणी करून नव्याने अवघड गावांची यादी घोषित करा-शिक्षक समितीची मागणी

तत्काळ मागण्या मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आश्वासन

गोंदिया :- जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची भेट घेवून चर्चा केली असता सर्व. मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांची भेट घेऊन प्रलंबित विविध समस्यांकडे लक्ष वेधून घेतले असता प्रलंबित चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची मागणी केली असता यानूषंगाने युद्धस्तरावर काम सुरू असल्याचे सांगितले आतापर्यंत 200 शिक्षकांचे चटोपाध्याय प्रकरणे पडताळणी झाली असून निवडश्रेणी प्रकरणासंदर्भात 300 शिक्षकांच्या सेवा पुस्तकांची पडताळणी झाली आहे लवकरच पात्र सर्व शिक्षकांच्या सेवापूस्तिका पडताळणी करून यादी मंजुरीसाठी सिईओ पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले,मागील अनेक वर्षांपासून शिक्षक समितीने अवघड क्षेत्राची नव्याने निश्चिती करून त्याअनुषंगाने अतिसंवेदनशील असणार्‍या गावांचा समावेश करण्याची मागणी जि.प.कडे रेटून धरली आहे यासंदर्भात परिवहन विभाग, पोलीस विभाग व दूरसंचार विभाग यांच्या कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने अवघड क्षेत्राची निश्‍चिती करून नवीन अवघड क्षेत्राची नस्ती फाईल लवकरच मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे प्रस्तावित केली जाईल,हिंदी मराठी सूट व संगणक सूट सर्व प्रकरणे निकाली काढणे,215 शिक्षकांची पूर्व परीक्षा परवानगी यादी अंतिम टप्प्यात असून 210 च्या जवळपास कार्य्योत्तर परिक्षा परवानगी यादी तयार करण्याचे काम सूरु आहे 31 जानेवारी पर्यंत सर्व याद्या अंतिम करून प्रकाशित करण्यात येणार आहे,स्थायी संदर्भातील प्रकरणे काढण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी यांच्याशी चर्चा करून सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले

जिपिएफ पावती अप्राप्त असणाऱ्या शिक्षकांचे खाते अपडेट करण्याचे काम सूरू असून आठ दिवसात सर्व पावत्या पंचायत समितीला मिळणार आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार,राज्य कार्यकारीणी सदस्य संदिप तिडके, जिल्हा सहसचिव शरद पटले,तालूका संघटक जिवन म्हशाखेत्री उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!