AGM News24

Latest Online Breaking News

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय….

नवी दिल्ली – वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं. या प्रकरणी भाजपने कोर्टात धाव घेतली होती. viagra generique en ligne france कोर्टाने निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं.

आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव अंसंवैधानिक, बेकायदेशीर आणि विधानसभेच्या अधिकाऱ्यांच्या पलीकडे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अठवण, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तीकुमार बागडीया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!