AGM News24

Latest Online Breaking News

सौंदड जि.प.क्षेत्रात गड आला पन सिंह गेला

प्रधान संपादक अनिल मुनिश्र्वर AGM News 24

सडक-अर्जुनी: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपला भरघोस यश मिळाले असून, भाजपला जिल्हा परिषदे मध्ये ५ पैकी ४ व पंचायत समिती गणात १० पैकी ७ जागांवर विजय मिळविण्यात यश आले. यामधे सर्वाधिक चुरशीची लढत सौंदड जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण व खोडशिवनी पंचायत समिती क्षेत्रात मध्ये झाली. या ठिकाणी सुरवातीपासून जिल्हावासींच्या नजरा लागल्या होत्या. कारण हा क्षेत्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, यावेळी भाजपने गड राखला.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी यांनी संदीप मोदी, मदन साखरे, चरनदास शहारे, व इतर भाजपच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन कॉंग्रेस मधील निशा तोडासे यांना भाजपा मध्ये आणले. वरिष्ठ नेते माझी मंत्री राजकुमार बडोले, आमदार परीणय फुके, खासदार सुनील मेंढे आणि संपर्क मंत्री विरेंद्र अंजनकर यांना विनंती करून निशा तोडासे यांना भाजप तर्फे सौंदड जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली. तसेच सौंदड पंचायत समितीत वर्षा चरणदास शहारे व खोडशिवनी पंचायत समितीची उमेदवारी हर्ष विनोदकुमार मोदी यांनी स्वतःकडे ठेवली.

प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांनी स्वताच्या खांद्यावर घेतली होती. निशा तोडासे व सौंदड पंचायत समितीच्या वर्षा शहारे विजयी झाल्या. खोडशिवनी पंचायत समिती गणात उन हर्ष मोदी अल्पश: मतांनी पराभूत झाले. खोडशिवनी पंचायत समिती क्षेत्र १५ वर्षा पासुन हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून येथून आजपर्यंत दुसर्‍या कोणत्याही पक्षाला येश संपादीत करता आले नाही. तरीपण या वेळी हर्ष मोदी यांनी काट्याची टक्कर देऊन लडत रंगतदार केली. हर्ष मोदी यांच्या पराभवाने या क्षेत्रामध्ये भाजप करिता गड आला पण सिंह गेला यासारखी परिस्थिती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!