AGM News24

Latest Online Breaking News

नवजीवन विद्यालय राका येथे 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा

गोंदिया, सडक अर्जुनी – नवजीवन शिक्षण संस्था राका द्वारा संचालित नवजीवन विद्यालय राका येथे दिनांक 26 जानेवारी 2022 रोज बुधवारला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वा. ध्वजारोहण मा. यशवंत दूनेदार अध्यक्ष नवजीवन शिक्षण संस्था राका, यांच्या शुभहस्ते, मा. मधुसुदनजी दोनोडे सचिव नवजीवन शिक्षण संस्था राका, अध्यक्षतेखाली, तसेच मा. उदारामजी कोल्हेकर सदस्य नवजीवन शिक्षण संस्था राका, मा. रमेशजी दोनोडे सदस्य नवजीवन शिक्षण संस्था राका, मा. राजेशजी रामटेके सरपंच ग्रा. पं. राका, मा. महेंद्रजी हटेले सदस्य ग्रा. पं. राका, सौ. शिल्पाताई चांदेवार सदस्य ग्रा. पं. राका, सौ. कांताबाई नागोशे माजी सदस्य ग्रा. पं. राका, मा. मुन्नालाल पंचभाई पोलीस पाटील राका, मा. कैलाश रामटेके माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, मा. वसंतजी उपरिकर माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, मा. कवळू बेंदवार पालक, कु. पद्मा चुटे मुख्याध्यापिका नवजीवन विद्यालय राका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काही शालेय विद्यार्थी, गावातील युवक, युवती, जेष्ठ नागरिक, तसेच महिला मंडळी उपस्थित होत्या. कोरोना संकट लक्षात घेता सर्व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!