AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत २२ वर्षीय तरुणीने रचला इतिहास.

गोंदिया- जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातील पांजरा जिल्हा परिषद क्षेत्रातील जनता की पार्टी (चाबी संघटना) चे उम्मीदवार वैशाली पंधरे या २२वर्षीय तरुणीने राष्ट्रीय पक्षांचा पराभव करत जिल्हा परिषदेवर विजय मिळवला आहे. ज्याची संपूर्ण जिल्ह्यात तसेच राज्यात चर्चा आहे. वयाने लहान असूनही जनतेचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद याने चिवट संघर्ष करून या निवडणुकीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे बडे नेते प्रचारासाठी आले होते, मात्र अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी या सर्वाना आपल्या नेतृत्वाची जागा दाखवली आहे. संपूर्ण गोंदिया तालुक्यात जनता की पार्टी(चाबी संघटन) पक्ष निवडणुकीच्या मैदानात होता, त्यापैकी आमदार विनोद अग्रवाल यांच्या संघर्षामुळे आणि 2 वर्षाच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी 4 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांच्या जागा जिंकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!