AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयावर खोडशिवनी परिसरातील शेतकऱ्यांचा हल्लाबोल.

सडक अर्जुनी ( तालुका प्रतिनिधी )

 

सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयावर भाजप नेते शेषराव गिरेपुंजे यांच्या नेतृत्वात खोडशिवणी परिसरातील शेतकऱ्यांचा हल्लाबोल, खोडशिवणी परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शन साठी डिमांड भरूनही त्यांना कनेक्शन न मिळाल्याने व ज्यांचे विद्युत कनेक्शन आहे त्यांची थकबाकी रक्कम वसूल करण्याकरिता विद्युत विभाग तगादा लावत असून त्यांचे विद्युत कनेक्शन कापत असल्याचे कारण पुढे करून भाजप नेते शेषराव गिरेपुंजे यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांसोबत शेषराव गिरेपुंजे यांनी निवेदन देऊन समस्याचे तरी त्वरित निराकरण करून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेषराव गिरेपुंजे यांनी केली आहे.

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!