AGM News24

Latest Online Breaking News

सडक-अर्जुनी मिनी लॉकडाऊनच्या दिशेने, शनिवार आठवडी बाजार बंद!

सडक-अर्जुनी – जिल्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. काल पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आज शनिवारचा साप्ताहिक आठवडी बाजार (market) बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

दुसर्‍या लाटे नंतर आता पुन्हा जिल्हा लॉकडाऊन च्या मार्गावर जाताना दिसत आहे.

शनिवारी भरणार्‍या आठवडी बाजारात होणार्‍या गर्दीमुळे शहरात पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पाश्र्वभूमीवर नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यंत शनिवार आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!