AGM News24

Latest Online Breaking News

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.

अरविंद मेंढे,

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात,
“भारताचे माझी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान जय किसान’ चा नारा भारताला बलशाली बनवणारा आहे. शेतकरी बांधव आणि भारत मातेची सेवा करणाऱ्या जवानांसाठी तळमळीने कार्य करणारे ते थोर नेते होते. भारतातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी प्रधानमंत्री पदापर्यंत प्रवास केला. परंतु त्यांची साधी राहणीमान खास होती. त्यांचे असामान्य व्यक्तिमत्व युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे.
स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन “.

 

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!