AGM News24

Latest Online Breaking News

राष्ट्रीय महामार्गाला जंगल परिसरातून बांधकामास मिळाली दहा वर्षानंतर वन विभागाची मंजुरी.

Featured Video Play Icon

अनिल मुनीश्वर, गोंदिया

हजाराच्या संख्येत झाडांची कत्तल करून वन विभागाच्या जमिनीवर बनणार ओवर ब्रिज.

अंदाजीत 360 कोटी बांधकामावर होणार खर्च.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जो आता 53 झालेला आहे या महामार्गाचे रुंदीकरण 2012-13 मध्ये सुरू झाले होते परंतु वन विभागाच्या आवश्यक असलेल्या मंजुरी अभावी महामार्गाचे बांधकाम रखडले होते आज दहा वर्षानंतर 2021 मध्ये महामार्गाचे रुंदीकरण करण्याकरिता बांधकामास आवश्यक ती मंजुरी मिळाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यां मार्फत मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग 45 मीटर रुंद होणार असून मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या मौल्यवान झाडांची कत्तल करण्यात आली असून विभागाने झाडांची गणना केली आहे मात्र या झाडांची विल्हेवाट कशी लावणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे,या मार्गावर चार उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर साकोली तालुक्यातील जामडी वन जमिनीवर एक पूलाचे बांधकाम होणार आहे तसेच सडक-अर्जुनी तालुक्यात ससे करण मंदिर परिसरात दुसरा पूल देवरी तालुक्यात मासुळकसा घाटात तिसरा पूल आणि चौथा पूल रूप रिसॉर्ट शिरपूर जवळ बांधण्यात येणार आहे या बांधकामाची अंदाजित किंमत 360 करोड रुपये असून अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात येणार आहे या जंगल परिसरातील उड्डाणपुलामुळे मार्गात वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांची अपघात होऊन मृत्यू होत होती ती थांबण्यास मदत होईल आणि वन्य प्राणी सुरक्षित राहतील हे मात्र खरे.

राष्ट्रीय महामार्ग वरील झाडांची गणना करण्यात आली असून संपूर्ण कापलेली झाडे जवळच डोंगरगाव/डेपोमध्ये जमा करण्यात येतील व रिकामी झालेली जागा महामार्ग प्राधिकरण ला सुपुर्द करण्यात येईल व कत्तल झालेल्या झाडांची पुनर्लागवड करण्यात येणार आहे.

सुनील मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, सडक अर्जुनी

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!