AGM News24

Latest Online Breaking News

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पांढरी व कनेरी येथे माजी मंत्री इंजी.राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

कोंसमतोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे उमेदवार सौ.छायाताई चौव्हाण,कोसमतोंडी पंचायत समिती क्षेत्राचे उमेदवार सौ.निशाताई काशिवार,कोकणा पंचायत समिती क्षेत्राचे उमेदवार खेमराज भेंडारकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंसमतोडी,पांढरी,कनेरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी भाजपा नेहमी जनकल्याणाचे कार्य करण्यासाठी तत्पर असते.केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करण्यात आले आहे आणि पुढे सुद्धा सुरूच राहील.यावेळी प्रत्येक भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवारांना आशिर्वाद द्यावा.सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे.असे आवाहन माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केले आहे.

याप्रसंगी माजी आमदार खोमेश रहांगडाले,तालुकाध्यक्ष अशोक लंजे,आदिवासी नेते श्लक्ष्मीकांत धानगाये, जीवन लंजे,जिल्हा सचिव शेषराव गिर्‍हेपुजे,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.भुमेश्वर पटले, विश्वनाथ रंहागडाले,माजी जि.प.सदस्य .मिलन राऊत,तालुका महामंत्री गिरधारी हत्तीमारे, शीशीर येळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,महिला तालुकाध्यक्ष पद्माताई परतेकी,तालुका उपाध्यक्ष कु.कविताताई रंगारी,माजी सभापती सौ.शिलाताई भेंडारकर,माजी जि.प.सदस्य सौ.छायाताई चौव्हाण,जिल्हा परिषद प्रमुख गौरेश बावनकर,मनोहर काशिवार,शालिदर कापगते,प्रल्हाद वरठे, विलास चौव्हाण,मयुर रामटेके, डीलेश सोनटक्के,व्यंकट चौधरी, विनोद काशीवार यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,स्थानिक कार्यकर्ता व नागरिकांनी उपस्थित होते.

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!