AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ बिस्किट चे वाटप करण्यात आले.

Featured Video Play Icon

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सडक अर्जुनी च्या वतीने सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर यांच्या अध्यक्ष ते खाली स्थानीय शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फल व बिस्कीटचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे शुभारंभ मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाल शास्त्री जांभेकर च्या प्रतिमे ला अभिवादन करून ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व तालुक्यातील पत्रकारांनी मिळून रुग्णांना फळ व बिस्किट वितरित केले, यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉन पशिने यांनी पत्रकारांना पत्रकार दिवसाच्या शुभेच्छा देऊन पत्रकारांनी सामाजिक कार्यक्रम व उपक्रम राबवून विविध सामाजिक प्रसंगी सामान्याच्या हीताचे कार्य करण्याचे आवाहन केले.
फळ व बिस्किट वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, राजेश मुनीश्वर, मुन्नासिंग ठाकूर, अशोक इलपाते, राधेश्याम कवरे, अरविंद मेंढे, उमराव मांढरे, अरविंद बिसेन, विक्रंम पुरी, निखिल मुनीश्वर, दुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद भुते, ग्रामीण रुग्णालयाचे दंत चिकित्सक डॉक्टर अनिल आटे, उपअधीक्षक वामन शिवणकर, अंबादास उईके, वीरेंद्र मेश्राम व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!